आज मी आहार व जीवनशैली बद्दल बोलणार आहे. आहार व जीवनशैली कशी असावी? कोणते बदल करणे आवश्यक आहे? इत्यादी सर्व मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहे.
आपण जे आजार बघतो ते सगळे जीवनशैलीशी निगडीत आजार आहेत. टायफाइड व मलेरिया हे आजार जिवाणू आणि विषाणूंपासून झालेले आजार असतात. जे आपण औषध देवून बरे करू शकतो. परंतु जीवनशैलीचे आजार हे जुनाट असतात. एकदा का हे आजार झाले तर यांच्यापासून बरे होणे हे कठीण असते. तर यांना जीवनशैलीचे आजार हे नाव का पडलं. तर जेव्हा हे आजार पहिल्यांदा दिसायला लागले. तेव्हा कोणत्या अशा ठराविक घटकापासून हे आजार झालेले नाहीत. जीवाणू आणि विषाणू यांच्यापासून झालेले आजार नाहीत. तर जीवनशैली काही घटक असतात त्यांच्या पासून हे आजार झालेले असतात, असं सुरुवातीला लक्षात आले.

हे आजार कशामुळे होतात? जीवनशैलीतील बदल यात दोन प्रकारचे बदल असतात. काही घटक हे धोक्याचे असतात आणि काही घटक हे सुरक्षित ठेवणारे असतात. भारत व चीन या देशात जसजसे बदल होत गेले. त्यानुसार जीवनशैलीच्या आजारांनी डोक वर काढायला सुरुवात केली. भारतामध्ये खेड्यापाड्यातही डायबिटीस दिसू लागला आहे. जेव्हा सामाजिक बदल होत असतात. तेव्हा धोक्याचे घटक वाढत असतात. आणि आपल्याला सुरक्षित ठेवणारे घटक कमी होतात. जीवनशैलीच्या आजारामध्ये आपली शारीरिक रचना, जणूकीय रचना, शरीर कसं बनलं आहे. ह्याचा खूप मोठा हात असतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हनुसार, दर दहाव्या व्यक्तीच्या रक्तातील साखर वाढलते. दुसरे म्हणजे खेडेगावात सुद्धा डायबिटीस आणि बीपीचे प्रमाण वाढलेले आहे. आणि खेडे विभागात सुध्दा रक्तात साखर वाढलेली आढळली. पुर्वी डायबिटीस हा सदन लोकांना आजार समजला जायचा. आज हा खेड्यापाड्यांचा आजार झालेला आहे. जितकी शारीरिक हालचाल खेड्यात केली जायची ती सुध्दा कमी झालेली आहे.
यातले बरेचसे आजार हे लठ्ठपणाशी व वाढलेल्या चरबीशी संबंधीत आहेत. जे लोक लठ्ठ आहेत, त्यांच्यामध्ये कॅन्सरचा धोका जास्त आहे. हे सगळेजण मान्य करतात. अशाच प्रकारे जीवनशैलीच्या बाकी आजारांचा सुध्दा लठ्ठपणाचा खूप जवळचा संबंध आहे. लठ्ठपणा हा इतका महत्त्वाचा का आहे? कारण की लठ्ठपणा आणि वाढलेली चरबी हे एक लक्षण आहे. जीवनशैलीचे आजार हे फक्त वाढलेल्या चरबीमुळे होत नाहीत. तर याला धोक्याचे घटक व सुरक्षित घटक ही कारणीभूत आहेत. लठ्ठपणा हे लक्षण आहे.
चरबी ही ऊर्जेचा साठा करणारी पेशी आहे. शरीरात ही चरबी साठवून ठेवली जाते आणि आपल्याला गरज पडेल तेव्हा ती वापरली जाते. आपल्या शरीरात हार्मोन्समध्ये बदल होतात. त्याच्याशिवाय रासायनिक बदल होतात. हे सगळे बदल चरबी तयार करते. हे कुठेतरी डायबिटीस, बीपी, ह्रदयरोग आणि स्ट्रोक यांच्यासाठी कारणीभूत ठरतं. आता ही वाढलेली चरबी ही प्रत्येकासाठी सारखीच धोकादायक नाही आहे. काही लोकांच्या शरीरामध्ये चरबी थोडीशी वाढली तरी त्याने जास्त त्रास होतो. काही लोकांच्या शरीरामध्ये खूप वाढली तरी त्यांचा त्रास कमी दिसतो. लिव्हर आणि स्वादूपिंड या अवयवांच्या भोवती तयार झालेली चरबी ही अत्यंत धोकादायक असते. तर ही चरबी आपल्याला वरुन दिसतं नाही. आपल्याला जीवनशैलीचे आजार होण्यासाठी शारीरिक आणि जनूकिय रचना महत्त्वाची आहे.

जीवनशैली व लठ्ठपणाचा उपचार?
जर जीवनशैली सुधारली आणि लठ्ठपणा कमी केला. तर डायबिटीस बरा होऊ शकतो. टाईप २ डायबिटीसचा उपचार कसा करायचा तर त्यामध्ये आपला आहार व व्यायाम याकडे लक्ष दिले पाहिजे.
लठ्ठपणाचा उपचार
लठ्ठपणा मोजाचया कसा?
वाढलेली चरबी मोजायचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे बॉडी मास इंडेक्स. आपले वजन आणि उंची यावरून बॉडी मास इंडेक्स मोजत असतो. दुसरं म्हणजे आपल्या पोटाचा घेर मेजर टेपने मोजने. हे दोन्ही अगदी सोपे असे उपाय आहेत.
जीवनशैलीतील इतर घटक सुध्दा मोजता येतात. तर आपण फक्त चरबी का मोजायची. बाकीचे घटक देखील मोजून बघायचे. आपल्या आहारामधील काही गोष्टी मोजू शकतो.