About

वैद्यकशास्त्र वेगाने प्रगत होत आहे. तंत्रज्ञान आणि नवीन पद्धती ह्यामुळे सामान्य लोकांना वैद्यकीय ज्ञान अधिकच किचकट वाटयला लागलं तर त्यात काही नवल नाही. ज्ञानाच्या किचकट रूपामुळे लोकांमध्ये आणि आरोग्यक्षेत्रामध्ये दुरावा वाढतो आहे. हा दुरावा कमी करायचा असेल तर आधुनिक वैद्यकीय ज्ञान सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचायला हवं. त्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. माझ्या ब्लॉगमधील माहिती अचूक आणि शास्त्रीय पण सोप्या भाषेत ठेवायचा प्रयत्न केला आहे. आरोग्याविषयी माझे काही वैयक्तिक अनुभव आणि मतं सुध्दा आहेत. बराचसा मजकुर हा मराठीतच आहे व काही मजकूर इंग्रजी मध्ये सुद्धा आहे. लेख आवडले तर नक्की शेअर करा! तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्वाच्या आहेत. प्रतिक्रियांसाठी मनापासून आभारी आहे! तुमचे काही प्रश्न असतील तर उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. तुमचाच . डॉ विनायक हिंगणे

I am passionate about medicine. Not only as a science but as a culture as well. Medical profession relies heavily on the doctor patient relationship and their communication. Rapidly developing science and technology make it difficult for patients to keep up with the confusing medical jargon. I believe that discussing health in simple language works wonderfully to bridge the gap. It strengthens the doctor patient relationship. Majority of my articles are in Marathi and some are in English. I have tried to keep it simple and scientifically accurate . Please share the articles and comment whenever possible. Your comments encourage me greatly!  Thanks.

Dr Vinayak Hingane

4 thoughts on “About

 1. डॉ. विनायक हिंगणे यांस सादर प्रणाम,
  डॉ.तुमची वेबसाईट पाहिली वैद्यकशास्त्राच्यादृष्टीने फारच माहितीपूर्ण आहे त्याबद्धल आपणांस धन्यवाद.
  डॉ.माझी काही रोजची घेण्याची औषधे आहेत त्याबद्धल मला मार्गदर्शन कराल का?

  आपला नम्र
  प्रदीप नरहरी तोंडवळकर

  Like

  1. नमस्कार.
   अभिप्रायाबद्दल धन्यवाद।
   औषधांबद्दल जर सार्वजनिक समज/ माहिती ह्याबद्दल शंका असेल तर त्याबद्दल मदत करू शकेन. वैयक्तिक शंका असेल तर नेहमीच्या डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच बरा. त्यांनी शारीरिक तपासणी आणि रिपोर्ट बघून औषधे दिलेली असतात. त्यात मी तपासणी न करता सल्ला देणे योग्य नाही.

   Like

   1. डॉ.मला सार्वजनिक माहिती ह्या स्वरूपातच माहिती हवी आहे

    प्रदीप नरहरी तोंडवळकर

    Liked by 1 person

 2. चालेल. कुठल्या विषयावर माहिती हवी त्याचे ते प्रश्न मला इमेल करू शकाल का? त्याविषयी छोटा लेख लिहून ब्लॉग वर पोस्ट करता येईल. माझा ईमेल vinayakhingane@gmail.com

  Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s