तरुणांचे आरोग्य

जीवनशैलीचे आजार हे पूर्वी उतारवयात होणारे आजार म्हणून ओळखल्या जायचे. ते आजकाल तरुण पिढीत सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसायला लागले आहेत. इतक्यातच मी चाळीशीच्या आतील दोन तरुणांचा हृदयविकाराच्या मोठ्या झटक्यासाठी उपचार केला. वय वर्ष 30 ते 35 अशा वयोगटातील बरेच पेशंट उच्च रक्तदाब आणि डायबेटीस साठी दाखवायला येतात. ह्यांचे सगळ्यांचे आजार हे जीवनशैलीतील दोषांशी निगडित आहेत. … Continue reading तरुणांचे आरोग्य

नववर्षाचा संकल्प

आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!