नववर्षाचा संकल्प

आपल्या जीवनशैलीत सकारात्मक बदल केले तर खूप मोठे फायदे होतात. हे फायदे आपण मोजून बघू शकतो. नवीन वर्षात तुम्ही सुद्धा हे करू शकता. यशस्वी उदाहरणांतून आपल्याला बरंच काही शिकता येतं. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण आपलं आरोग्य सुधारू शकतो. नवीन वर्षात आरोग्यासाठी संकल्प नक्की करा. हे संकल्प पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. हा संकल्प अगदी छोटा असला तरी चालेल. आपल्या प्रयत्नांचा काही फायदा होतो आहे का हे तपासून बघा! नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि भरभराटीचे जावो ही शुभेच्छा!

जीवनशैलीचे आजार: एक चित्र

लठ्ठपणा आणि जीवनशैलीचे आजार ह्यांचा संबंध फार घनिष्ट आहे. डायबेटीस, उच्च रक्तदाब, हृदयरोग ह्या सगळ्यांसाठी धोकादायक असलेले जीवनशैलीचे घटक आणि लठ्ठपणासाठी धोकादायक घटक सारखेच आहेत. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, बैठी जीवनशैली , अपुरी झोप, अखंड ताणताणाव इत्यादी महत्वाचे धोक्याचे घटक आहेत. लठ्ठपणा म्हणजेच वाढलेली चरबी ! ही कधी कधी दिसते तर कधी अदृश्य (म्हणजे पोटात … Continue reading जीवनशैलीचे आजार: एक चित्र