नाजा-२०० नावाच एक होमिओपॅथिक औषध आहे. साप चावलेल्या रुग्णांना हे औषध द्यायचं का ? हा प्रश्न उद्भवला कुठून ? या प्रश्नाबाबत होमिओपॅथिकचे तज्ज्ञ काय म्हणतात. तसेच मॉर्डन मेडिसिन यांच्याबद्दल काय म्हणतं हे आज आपण थोडक्यात समजून घेऊ.
मुळात व्हॉटस्अँप युनिर्वसिटीमधून हा प्रश्न उद्भवलेला आहे. होमिओपॅथिकचे तज्ज्ञ नाजा-२०० हे औषध साप चावल्यावर वापरा हे असं सांगतचं नाहीत. तर सोशल मीडियावरची एक पोस्ट आहे. जी या औषधाची खोटी जाहिरात करते. या पोस्टमध्ये असे सांगण्यात आलेले आहे, साप चावल्यावर नाजा-२०० हे औषध देण्यात यावं. हे औषध दिल्यावर पेशंट बरा होतो. आणि त्याला दवाखान्यात नेण्याची गरज सुध्दा पडत नाही. पण जर वास्तविकता पाहिली, तर असं मुळीच नाही आहे. हा पूर्णपणे खोटा आणि चुकीचा समज आहे. मी माझ्या होमिओपॅथिक डॉक्टर मित्रांना विचारले की, साप चावल्यावर असे औषध दिले जाते का ? तर त्यांनी सांगितले की, ही सर्व खोटी माहिती आहे. डॉक्टरांनी होमिओपॅथिक लिटरेचरचा अभ्यास केला. तर त्यांना कुठेही असा संदर्भ आढळला नाही.

नाजा-२०० हे औषध इतर आजारांवर वापरले जाते. पण साप चावल्यावर हे औषध घ्यावं असेही होमिओपॅथिकमध्ये कुठेही सांगितलेले आढळत नाही. होमिओपॅथिकचे डॉक्टर अशा औषधीचा पुरस्कार करत नाही. ते असं ही कधी सांगत नाही. साप चावल्यावर नाजा-२०० घ्या. होमिओपॅथिक तज्ज्ञांनी सांगितले की, अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करू नका.
मॉर्डन मेडिसिनमध्ये सुध्दा नाजा-२०० किंवा तत्सम कुठलीही तोंडातून देण्यात येणारी औषध साप चावल्यावर उपयोगी ठरतात, असा कुठेही संदर्भ सापडत नाही. मॉर्डन मेडिसिनमध्ये सुध्दा या औषधाचा पुरस्कार केलेला नाही. त्यामुळे हे औषध साप चावल्यावर रुग्णांना देऊ नये. सुजाण नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये.
प्रत्येक साप हा विषारी नसतो. पण विषारी साप जर चावला. तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. सापाचे दात हे हायपोडर्मिक निडल्स सारखे असतात. ते इंजेक्शन सारखे विष शरीरात टोचतात. या विषाचा परिणाम रक्ताच्या संस्थेवर, किडनीवर किंवा मज्जा संस्थेवर होत असतो. आपल्या शरीरात विष गेलं असेल तर ते काढता येत नाही. त्या विषाला न्यूट्रलाईज करण्यासाठी किंवा विषाचा विरोध करण्यासाठी प्रति विष घ्यावं लागतं. घोणस, फुरसे, नाग आणि मण्यार या विषारी सापांच्या चार मुख्य प्रजाती आहेत. यांच्या विषाला मारक असं प्रति विष तयार करावं लागतं. हे औषध इंजेक्शनच्या मार्फत आपल्या नसांमध्ये शरीरात सोडलं जातं. प्रति विषांनी विषाचा प्रतिकार होतो. तसेच ते विष न्यूट्रलाईज होतंच. त्यामुळे रूग्णांचा जीव वाचायला मदत होते. याशिवाय मॉर्डन मेडिसिनमध्ये पेशंटला काही कॉम्प्लिकेशन झाले असतील. म्हणजे रुग्णांचा बीपी कमी झाला असेल. श्वास नीट घेत नसेल, तर त्याला श्वासोच्छवासाला मदत करण्यात येते. जीव वाचवणारी औषध रुग्णाला देण्यात येतात. त्यामुळे साप एखाद्या व्यक्तीला चावला. तर त्याला त्वरित दवाखान्यात घेऊन जाणं आवश्यक आहे. आपल्याला बऱ्याचदा विषारी आणि बिनविषारी सापांमधला फरक करता येत नाही. त्यामुळे कुठलाही साप चावला तरीही त्वरित दवाखान्यात जाणे, तसेच योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

साप चावल्यावर प्राथमिक उपचार करू शकतो. हात व पायाला साप चावला असेल त्याच्या अलीकडच्या भागामध्ये पट्टी गुंडाळणे. तसेच ही पट्टी करकचून बांधू नये. हात किंवा पाय स्थिर करावा. शरीराची हालचाल करू नये. लगोलग अशा व्यक्तीला दवाखान्यात घेऊन जावं. संबंधित व्यक्तीला दिलासा देऊन शांत करावे. तसेच रुग्णांची हिम्मत वाढवू शकतो. अशा प्रकारचे प्रथमोपचार करता येतात. परंतु प्रतिविष ज्या दवाखान्यात उपलब्ध आहे. तिथे घेऊन जाणं हे प्रथमोपचार आहे. ही शास्त्रीय माहिती डब्ल्यूएचओच्या वेबसाईटवर मिळू शकेल. तसेच नाजा-२०० सारख्या औषधांना पाठबळ देऊ नका.
(युट्यूब चॅनेलच्या लिंकवर जाऊन व्हिडिओ सुद्धा पाहू शकता)